Pune District : विद्या प्रतिष्ठानच्या ३४ मुलांचा स्काऊट राज्य पुरस्काराने सन्मान

भोर : सात जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड ट्रेनिंग सेंटर रामबाग भोर येथे घेतल्या गेलेल्या राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये स्काऊट विभागातून दहा विद्यार्थी व दिनांक ११ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीमध्ये झालेल्या गाईड राज्य पुरस्कार परीक्षेमधून २४ विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
राज्य पुरस्कारसाठी विविध प्रकारच्या परीक्षा घेतला जातात. यामध्ये प्रामुख्याने लेखी परीक्षा तोंडी परीक्षा तसेच प्रॅक्टिकल परीक्षा तसेच त्यांचे लेखन कार्य अशा विविध प्रकारच्या ३० परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षा चार दिवस निवासी शिबिरामध्ये घेतल्या जातात.या परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार दिला जातो. शाळेतील दोन्ही विभागातून ३४ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांची सही असलेले सर्व विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे.
राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांची नावे : साई शरद मालुसरे, श्रेयश संपत तुपे, वेदांत अरविंद पठारे ,यश राजू डाळ, अविराज संदेश शेडगे, दक्ष रुपेश जाधव, श्रीराज अनिल चव्हाण, समरजीत सुहास घोडके, सोहम विक्रम केंद्रे, यश विराज नेवसे.
गाईड विभाग राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींची नावे : ज्ञानदा संतोष भोसले, मेघना प्रवीण गायकवाड, अदिती सचिन घोणे, श्रेया नितीन इंजरकर, आनंदी वसंत जाधव, ईशा समीर जाधव, सई योगेश जगदाळे, अर्णवी सुरेश कडू, अलिषा इरफान खान, शौर्या नंदकुमार नेवसे, निष्का राकेश ओसवाल, प्रांजल विलास राऊत, श्रुती समीर सागळे, जान्हवी मनोज शेटे, सृष्टी संतोष भैरट, सानवी नितीन बोडके, आदिती राहुल धुमाळ, श्रावणी राहुल गिलबिले, समृद्धी अमोल पवार, शमिका प्रसाद शिवभक्त, मनस्वी मुरलीधर झेंडे. तनिष्का दत्तात्रय म्हके, ऋषिका विलास गोळे, श्रुतिका राजेंद्र माने.
यांचे मार्गदर्शन…
मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे तसेच स्काऊट गाईड विभाग प्रमुख संतोष मादगुडे, रागिनी भोसले यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. तसेच गाईड विभाग प्रमुख संध्या बांदल, सह शिक्षिका दमयंती पैलवान, रेणुका बांदल, दत्तात्रय महांगरे, निवृत्ती खोपडे, यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.





