पुणे जिल्हा : श्री मळूदेवी यात्रेत धावले 190 बैलगाडे

वाळद येथे राजू घोंगे यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा
राजगुरूनगर – वाळद (ता. खेड) येथे श्री मळूदेवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते तर बैलगाडा शर्यती घेण्यात आल्या यात 190 बैलगाडे धावले.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर यांच्या हस्ते बैलगाडा घाटाचे उद्घाटन झाले. यावेळी उपसरपंच विक्रम पोखरकर, यात्रा कमिटी अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, श्याम कोरडे, मनोहर कोरडे, अंबर सावंत, दामू लांडगे, चंद्रकांत पोखरकर, रामदास पोखरकर,
अशोक पोखरकर, प्रकाश पोखरकर, जालिंदर पोखरकर, संतोष पोखरकर, नाथा पोखरकर, विलास पोखरकर, सुरेश पोखरकर, विश्वनाथ वाळुंज, गुलाब पोखरकर, नितीन वाळुंज, दादाभाऊ वाळुंज, डॉ. लहु पोखरकर, शांताराम पोखरकर, बाळासाहेब सावंत, अशोक गणपत पोखरकर, विशाल पोखरकर, बाळासाहेब कोरडे, बाळू भवारी, राम ओव्हाळ, दादाभाऊ वाळुंज यांच्यासह समस्त मुंबई, पुणे, खेड आणि वाळद ग्रामस्थ, पंचक्रोशीतील बैलगाडा शर्यत चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री मळुदेवीच्या यात्रेनिमित्ताने झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये घाटाच्या राजाचा मान राजू रोहिदास घोंगे (येणिये) यांच्या बैलगाड्याने पटकावला. पहिल्या क्रमांकात 14, दुसर्यात 35,तिसर्यात 34, चौथ्यात 17 बैलगाडे धावले फळीफोडमध्ये अनुक्रमे दत्ता चिंधू खाडे (सरपंच डेहणे), शिवाजी बाळासाहेब कदम(चिखलगाव), कै. अजित आत्माराम रोकडे बैलगाडा संघटना (साकुर्डी), भगवान शंकरराव घिघे यांच्या बैलगाड्याने मिळवला. आकर्षक बारीचा मान डॉ. संतोष मंगेश वाळुंज (वाडा ) यांच्या बैलगाड्याला मिळाला





