पुणे जिल्हा : 118 पैकी 19 जणांचे छतीचे एक्सरे अबनॉर्मल

वाल्ह्यात मोफत एक्स-रे शिबिर, क्षय रोग तपासणी
वाल्हे : ‘भव्य मोफत एक्स-रे शिबिर’ क्षय रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध, निदान, उपचार आणि समुपदेशन कार्यक्रमांतर्गत छातीशी संबंधित आजार असलेल्या 108 महिला व पुरुषांनी तपासणी केली. दरम्यान, तपासणी केलेल्यांपैकी 19 रुणांचे एक्स-रे अबनॉर्मल असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे योग्य समुपदेश करून त्यांना पुढील उपचारासंबंधित मार्गदर्शनही केले.
लोकसहभागातून जगनजागृती मोहिम या शिबिराचे आयोजन वाल्हे (ता.पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सरपंच अतुल गायकवाड, आयसीएमआर संशोधन अधिकारी बाबासाहेब भोंग यांनी केले. या शिबिरासाठी आदर्श सामाजिक फाउंडेशन, ग्रामपंचायत वाल्हे, प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे आणि आय सी एम आर नारी यांच्या माध्यमातून वाल्हे व पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला होता. दरम्यान, कमी वेळातही, ग्रामीण भागातील मजूर, शेतमजूर, शेतकरीवर्ग आदींसह अनेक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी, उपसरपंच अमित पवार, ग्रामपंचायत सदस्य हरी दुबळे, लाईफ लाईन डायग्नोस्टिक सेंटर श्रीगोंदा येथील, रेडिओलॉजी टेक्निशियन सागर शिंदे, यश गोरखे, एक्स-रे टेक्निशियन प्रवीण साळुंखे, आदर्श सामाजिक फाउंडेशनचे सचिव दादासाहेब राऊत, तुषार भुजबळ, दत्तात्रेय कुमठेकर, सुरेश भुजबळ, सागर शहा, शामराव पवार, संतोष भुजबळ, धनंजय भुजबळ आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात आय सी एमआर नारीचे संशोधन अधिकारी गिरीश राहाणे, धनराज कांबळे आदींनी रुग्णांचे समुपदेशन केले. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे, व एस टी एस फिरोज महात यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी, आशा सेविका रोहीणी पवार, सविता दुर्गाडे, ज्योती पवार, ज्योती महांगडे, कल्पना पवार, गटप्रवर्तक वैशाली दानवले आदींनी शिबिर यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.





