Pune District : 14 वर्षीय मुलीला पळवून नेत घरात डांबले

राजगुरूनगर : 14 वर्षीय मुलीला पळवून नेऊन घरात डांबून ठेवल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एका 18 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करून त्याला शिताफीने अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे यांनी दिलेली माहिती अशी, 22 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाडा-राजगुरुनगर रस्त्यावरील शांताई पेट्रोल पंपाजवळून 14 वरिष्ठ 6 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून आदित्य संतोष बोंबले (वय 18, रा. चांडोली) याने पळवून नेले होते.
तिला कोहिनकरवाडी येथे एका खोलीत डांबून ठेवले. संध्याकाळी पीडित मुलीने डांबून ठेवलेल्या खोलीतून आरडा ओरडा केला. त्यावेळी गावातील एका महिलेने तिची खोलीतून सुटका केली. यावेळी ग्रामस्थ जमा झाले होते त्यांनी गावातील पोलीस पाटलांना संबंधित माहिती देत पोलिसांना कळवले. घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली.
पोलिसांनी पीडित निर्भयाची फिर्याद घेतली. मात्र आदित्य संतोष बोंबले हा फरार झाला होता. पोलिसांनी मोबाईल टॉवरच्या माध्यमातून तात्काळ आज शोध घेत सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य बोंबले यास अटक केली. अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्रीकांत गोडगे करीत आहेत.





