Pune District : स्वकाम सेवा मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग चरणी सेवेसाठी रवाना

आळंदी – आषाढी यात्रा २०२५ साठी स्वकामकडून २८३ कार्यकर्ते दि. २६ जून ते १० जुलै या कालावधीसाठी पंढरपूर येथील मंदिर परिसरातील सेवेसाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी दिली. मंदिर व मंदिर परिसर ते दर्शन बारी पत्राशेड सेवा २४ तास सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याकरिता महिला १२९ व जालना परिसरातील ७३ पुरुष कार्यकर्ते सेवेसाठी आले आहेत.
याशिवाय आषाढी यात्रा पालखी सोहळ्यासाठी २४ सेवक देणगी विभागासाठी सेवा रुजू करण्यात आली आहे. अध्यक्ष सुनील तापकीर, महिला अध्यक्षा आशा तापकीर, सुभाष बोराटे, पंडित आल्हाट, नारायण आल्हाट, उमेश गावडे, बबन लोखंडे, अंकुश बटवाल, ज्ञानेश्वर सिनलकर, दत्ता फलके, चारुदत्त तांगडे,
दत्ता तांगडे, सुभाष तांगडे, अरुण तांगडे, राजू सस्ते, रामदास बांदल, सागर कोतवाल, चंद्रकांत जाधव आचारी, विलास भुजबळ, संतोष अरुडे, बापू सस्ते, प्रकाश ठाकूर, अरुण देवकाते, निलेश सस्ते, अरुण गाईचोर, विजय रामाणे, संभाजी फुगे, चौधरी, इतर सर्व सेवक व सेवेकरी यावेळी उपस्थित होते.





