Pune: सर्व तालुक्यात आज होणार लोकशाही दिन
Updated On:

पुणे : नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवारी (दि. १७ ) मार्च रोजी सकाळी ११ वाजता तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. अधिकाधिक नागरिकांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी या लोकशाही दिनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात पुणे शहर- मुंढवा, शिरुर-तहसिल कार्यालय, हवेली-कोंढवे धावडे, लोणी काळभोर- अष्टापूर, पिंपरी चिंचवड-निरगुडी, मावळ-लोणावळा, मुळशी-माले, खेड-वाडा, दौंड-यवत, पुरंदर-जेजुरी, जुन्नर-निमगाव सावा, आंबेगाव-मंचर, भोर-निगुडघर, वेल्हा-कोंढावळे खुर्द, बारामती-लोणी भापकर आणि इंदापूर- बावडा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.




