Pimpri : लोणावळ्यात आज लोकशाही दिनाचे आयोजन
Updated On:

लोणावळा : जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि.१७) लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. या लोकशाही दिनास तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांच्या विविध तक्रारी, शासकीय कामे व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपल्या अर्जासह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





