पुणे चाळिशी पार
Updated On:

पुणे – शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढण्याबरोबरच उकाड्यातही वाढ होत आहे. कमाल तापमानातही गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून शहरात बुधवारी कमाल तापमानाने चाळिशीचा आकडा पार केला.
शहरात गेल्या चोवीस तासांत 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. आगामी काळात तापमानाचा हा पारा असाच चढा राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.





