Pune Crime : शेजाऱ्याकडे भांडी मागायला गेले अन् जीव गमावला; धक्कादायक घटनेने खळबळ
Pune Crime : भांडी परत मागितली आणि वाद विकोपाला गेला; गंभीर जखमी झालेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू.
Updated On:

Pune Crime – वाघोली परिसरात नातेवाईकांकडे ठेवलेल्या गृहोपयोगी वस्तू, तसेच भांड्याच्या वादातून झालेल्या बेदम मारहाणीक एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी दाम्पत्याला अटक झाली आहे. भास्कर मोहन राठोड (वय ५८, रा. कोलदंडी, जिंतूर, परभणी) यांचा खून झाला असून आनंद रवींद्र वर्मा (वय २६), शीला आनंद वर्मा (वय २४, दोघे रा. आव्हाळवाडी, वाघोली, अहिल्यानगर रस्ता) यांना अटक झाली.
राठोड हे मूळचे परभणीतील जिंतूरचे रहिवासी आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. वाघोलीतील आव्हाळवाडी भागात त्यांनी भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. राठोड यांच्याशेजारी वर्मा दाम्पत्य राहायला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी गृहोपयोगी साहित्य आणि भांडी वर्मा दाम्पत्याकडे दिली होती.
१६ फेब्रुवारी राेजी राठोड यांनी भांडी परत मागितली. त्यावरून झालेल्या वादातून दाम्पत्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत राठोड हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपरीक्षक शहादेव शहाळे तपास करत आहेत.




