Pune Crime : दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली
Updated On:

पुणे – पादचारी ज्येष्ठ महिलेकडील ५० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगर भागात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार ज्येष्ठ महिला सहकारनगरमधील मराठे बंगल्याजवळून सायंकाळी साडेसातच्या सुमारास निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्याकडे पत्ता विचारण्याच्या बहाणा केला.
त्यांच्याकडील ५० हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पादचारी महिलांकडील दागिने तसेच पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.





