Pune Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे – सासरच्या व्यक्तींकडून सातत्याने होणाया मानसिक व शारीरीक त्रासाला कंटाळून विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे.
स्वप्निल रमेशचंद्र बाफना (३४ रा. रामवाडी गावठाण, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत महिलेचे वडील संजय संचेती (५८, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. मे २०१३ मध्ये फिर्यादी यांच्या मुलीचे स्वप्निल बाफना याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून ते रामवाडी गावठाण परिसरात एकत्र राहत होते. परंतु मागील काही दिवसांपासून महिलेची सासू- सासरे तिला मानसिक त्रास देत होते.
माहेरी निघून जा असे सांगत सासूने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या जाचाला कंटाळून तिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहीनी डोंगरे करीत आहेत.





