Pune Crime – दारूच्या नशेत मुलाने वडिलांचा पेटवून देऊन खून केल्याचा प्रकार दांडेकर पूल परीसरात घडला. पर्वती पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार रवींद्र उद्धव भालेराव ( वय ६१, रा. सर्व्हे क्र . १३० दांडेकर पूल ) असे मृताचे नाव आहे. त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून त्यांचा मुलगा सागर ( वय २८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवींद्र सुतारकाम करून उदरनिर्वाह करतात असत. मुलगा सागर हा ही छोटी मोठी कामे करतो. दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत शनिवारी ( दि. ७) उभयतांमध्ये भांडणे झाली. त्यावेळी सागरने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. या घटनेत रवींद्र गंभीररीत्या भाजले. सागरनेच आग विझवून त्यांना ससूनमध्ये दाखल केले.उपचार सुरु असताना मंगळवारी ( दि. ११) मध्यरात्री रवींद्र यांचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष महाले तपास करीत आहेत.