Pune Crime : धक्कादायक घटना! २३ वर्षीय महिलेचा पतीकडून खून; भवानी पेठेतील हत्येप्रकरणी तिघांना बेड्या
Pune Crime : पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अंगलट; ससून रुग्णालयात खोटी माहिती देणाऱ्या रिक्षाचालक पतीला खडक पोलिसांनी केली अटक.
Updated On:

Pune Crime – महिलेचा खून केल्याप्रकरणी खडक पोलिसांकडून पतीसह तिघांना अटक करण्यात आली. भवानी पेठेत ही घटना घडली होती.वैष्णवी ऊर्फ वर्षा तुषार तुपसौंदर्य (वय २३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुुपसौंदर्य (वय २८), मनोज रोहिदास कांबळे (वय ३९), वनिता मनोज कांबळे (वय ३२) यांना अटक करण्यात आली.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या महितीनुसार, तुषार रिक्षाचालक आहे. २८ जानेवारी रोजी त्याच्या कौटुंबिक कारणावरून वाद झाल्याने त्याने वैष्णवीला बेदम मारहाण केली होती. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी रुग्णालयातील डाॅक्टरांना त्याने खोटी माहिती दिली होती.
या घटनेनंतर तुषारने घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पतीसह तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.





