Pune Crime | सोसायटीत सुरक्षेचा फज्जा ; चतु:शृंगीतील घरफोडीत लाखोंचे दागिने लंपास
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना चतु:शृंगी भागात घडली. याप्रकरणी एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार कोथरूड भागात राहायला आहेत. चतु:शृंगी परिसरातील एका सोसायटीत त्यांची सदनिका आहे. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले.
गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे पुढील तपास करीत आहेत.





