Pune Crime : सराईत गुन्हेगारांस पाठलाग करुन पकडले; गाडीच्या डिक्कीत सापडले दागिने

पुणे – घरफोडीच्या गुन्हयातील आरोपींना चंदननगर पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्यांच्याकडून गुन्हयातील 44 हजार रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. सुमित मोहन शिंदे (22,रा. राजीव गांधी नगर, मेंटल कॉर्नर, हुसेन शाहबाबा दर्गाचे पाठीमागे, येरवडा ) व ऋतिक दत्ता सारगे, (19 , रा. स.नं. , सुरक्षानगर, सर्वधर्म सोसायटी जवळ, येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दिनांक 15/6/21 रोजी चंदननगर पोलीस खासगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना. पोलीस अंमलदार आव्हाड यांना खबर मिळाली की, घरफोडीच्या गुन्हयातील आरोपी चंदननगर भाजी मंडई शिवाजी पुतळा येथे येणार आहे. त्यांच्या गाडीला नंबर प्लेट नसून त्यांचे वर्णनही मिळाले होते. त्यानूसार पोलिसांनी साध्या वेशात थांबुन सापळा रचला. त्यांना संशयीत आरोपी मोपेडवर दिसतात, त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र पळुन जावुन लागले तेव्हा त्यांचा पाठलाग करुन त्यांना थोडयाच अंतरावर गाडीसह पकडण्यात आले.
त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सांगितले की, सुमारे सहा ते सात दिवसांपुर्वी गाडीवरून दुपारच्या वेळेस येऊन खराडी बायपास रोडवरील सोसायटी मधील एक बंद फ्लॅटचे दरवाजाचे लॉक व कडी कोयंडा तोडुन एका बॅग मधील सोन्याचे-चांदिचे दागिने चोरी केले होते. त्यावेळेस त्यांची अंगझडती घेता व त्यांचे ताब्यातील गाडीची डीक्कीची पाहणी करता त्यामध्ये एकुण 44 हजार रुपये किंमतीचे दागिने मिळुन आले.
सदरची कारवाई सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाल चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव , पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, सहा पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस अंमलदार राजेश नवले, अमित जाधव, तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर यांनी केलेली आहे.





