Pune Crime : पट्टेरी वाघाचे कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

Updated On:

पुणे – सातारा रोडवर पट्टेरी वाघाचे कातडीची तस्करी करून विक्री करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली. त्यांच्याकडून एका पट्टेरी वाघाचे कातडे, एक मोटारसायकल व 4 मोबाईल फोन असे एकूण 5,26,100 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना कळवण्यात आले असून आरोपींना पुढील कारवाईकामी राजगड पोलिस ठाण्याच्या  ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०१/०८/२०२१ रोजी  स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  पद्माकर घनवट यांना गोपीनाय बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार आहेत.

सदर गोपनीय माहितीचे आधारे सारोळा ब्रिज इथे सापळा लावून वाघाच्याकातडी  विक्रीसाठी आलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिनेश अशोक फरांदे (वय 38 रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा), हसन रज्जाक मुल्ला (वय 35 रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा) , गणपत सदू जुनगरे (वय 45 रा.देवदेव पो.मामुर्डे ता.जावळी जि. सातारा), सुनील दिनकर भिलारे (वय 52 रा.भिलार ता.महाबळेश्वर जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि माने, पोसई अमोल गोरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर,  गुरू जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे,  पूनम गुंड चालक प्रमोद नवले यांनी केली.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यातील नामांकित संस्थेवर कारवाई! परवानगी न घेताच हलवली शाळा; संस्थापकासह दोघांवर गुन्हा

2026-09-11 05:15:28

Pune Crime: पुण्यातील नामांकित संस्थेवर कारवाई! परवानगी न घेताच हलवली शाळा; संस्थापकासह दोघांवर गुन्हा

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

2026-09-09 17:46:05

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

2026-09-08 19:36:19

Santosh Pandit : संतोष पंडितला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वादग्रस्त रीलसाठी वापरलेला आयफोन, सीमकार्ड व ट्रायपॉड जप्त

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण

2026-09-05 16:03:35

Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण