पुणे – रिक्षा चालक असल्याचा बहाणा करत रात्रीच्या वेळी एकट्या दुकट्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लूटणाऱ्या मामा- भाचे टोळीस फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एख चोरीची रिक्षा, एक दुचकी आणि तीन मोबाईल असा 1 लाख 89 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्यावर जबरी चोरीचे तब्बल सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोन गुन्हे खूनाच्या प्रयत्नाचे आहेत.
अभिषेक बाळु ससाणे, ऊर्फे अभिषेक मनोज पाटील उर्फ भैय्या (20, रा. जयभवानी नगर, कोथरुड, मुळ. अहमदनगर) रवि यादव वाल्हेकर (रा. कोथरुड, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. यातील अभिषेपकचा रवि वाल्हेकर हा मामा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 6 फेब्रुवारी रोजी पहाटे अनुप शिवहरी शिगोकर (18, रा. मुळ गाव शेगाव जि बुलढाणा सध्या शिवाजीनगर ) व त्याचा मित्र सार्थक मालखेडे यांना रिक्षा चालक व त्यांचे साथीदारांनी रिक्षामध्ये तुकाराम पादुका चौक येथे बसवुन मंगळवार पेठेत लोखंडी पुलाचे खाली आणले. तेथे त्यांना चाकुचा धाक दाखवुन, त्यांचे खिशातील 1000 रुपये व मोबाईल फोन बळजबरीने काढुन घेतला. त्या मोबाईलमधील फोन पे वरुन 1,800 रुपये व 2000 रुपये बळजबरीने ट्रान्सफर करुन घेतले होते.
याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फरासखाना पोलीसांनी पथके तयार करुन तपास सुरु केला होता. दरम्यान पोलीस अंमलदार अंमलदार वैभव स्वामी, सयाजी चव्हाण यांना फर्ग्युसन रस्त्यावरील शितल हॉटेल चौकातील एका सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये आरोपी हे रिक्षामध्ये फिरत असल्याचे दिसुन आले. त्या रिक्षाचा सी.सी.टी.व्ही कॅमराद्वारे माग काढत असताना असताना आरोपीतांपैकी दोन आरोपी हे ज्ञानेश्वर पादुका चौकात ए.टी.एममध्ये पैसे काढत असताना दिसुन आले.
त्यानंतर रिक्षा क्रमांकांची वाहन या वेब साईट वरुन माहीती घेतली असता ती रिक्षा कोथरुड भागातुन चोरी झाली असल्याचे समजले. त्यानंतर आरोपी हे कोणत्या दिशेने गेले ? याची माहीती मिळुन येत नव्हती. त्या दरम्यान फोन पे या कंपनीस पत्र व्यवहार करुन त्यांचेकडुन पैसे कोणत्या मोबाईल नंबरला ट्रान्सफर झाले आहेत याची माहीती घेतली. त्यानंतर पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी, मोहन दळवी, शरद वाकसे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन त्या संशयीत सर्व मोबाईल नंबरचे वॉटसअपचे डी.पी. चेक केले.
त्यामधील एका मोबाईल नंबरवर तीन मुलांचे एकत्रितपणे फोटो असलेला डी.पी दिसुन आला. ते फोटो फिर्यादी व साक्षीदार यांना दाखविले असता त्यांनी ते फोटो पाहुन हे तिघेजण व आणखीन एका व्यक्तीने त्यांचे रोख रक्कम, मोबाईल फोन काढुन घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर तो नंबर जयभवानी नगर, कोथरुड भागात असल्याचे माहीती मिळाल्याने कोथरुड भागात जावुन अभिषेक ससाणे ऊर्फे अभिषेक पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. त्याच्या चौकशीत रवि वाल्हेकर आणि दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. त्याचे अंगझडतीमध्ये 6000 रुपये किंमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला.
त्याबाबत त्याचेकडे तपास करता त्याने व त्याचे साथीदारांनी सदरचा मोबाईल फोन चाकण येथे एकाचे हात पाय बांधुन त्याचेकडुन चोरी केला असल्याचे सांगितले. रोजी ताब्यात घेण्यात आले असुन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
आरोपींनी फरासखाना पोलीस स्टेशन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन , कोथरुड पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन , येरवडा पोलीस स्टेशन , चाकण पोलीस स्टेशन व भोसरी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड हद्दीत प्रवाशांना मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, उप आयुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, मेहबुब मोकाशी, मोहन दळवी रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, राकेश क्षिरसागर, संदीप कांबळे, समीर माळवदकर, ऋषीकेश दिघे, तुषार खडके, अजित शिंदे, शरद वाकसे, महावीर वलटे यांच्या पथकाने केली आहे.