Pune Crime: घरफोडी, चोरी करणाऱ्या आरोपींना बेड्या, लाखोंचा ऐवज जप्त

पुणे – गुलटेकडी परिसरातील कंपनीचे कुलूप तोडून 3 लाख 27 हजारांच्या परदेशी बनावटीच्या मशीनची चोरी करणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 77 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. लक्ष्मण शंकर कोल्हे (वय 24, रा. डायसप्लॉट, गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत शामराव पाठक (वय 67, रा शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
गुलटेकडी डायस प्लॉट इंडस्ट्रीयलमधील कंपनीचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईताची माहिती अंमलदार सोमनाथ कांबळे व संदीप साळवे यांना मिळाली. कोल्हे याला पथकाने सापळा रचून पथकाने अटक केली. भारती विद्यापीठ ते स्वारगेट असे पीएमटी बसने प्रवास करत असताना वृध्द महिलेची सोनसाखळी चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली होती. सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी पथकाची स्थापना केली आहे.
दरम्यान पोलिस अमंलदार सोमनाथ कांबळे, संदीप साळवे आणि मनोज भोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सचिन दत्तात्रय जाधव याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी झालेली सोनसाखळी जप्त करण्यात आली. तसेच सुनील लालू भंडारी (30, गोपापट्टी मांजरी) व इतर दोघांचा पीएमपीएल बसने प्रवास करताना मोबाईल चोरी झाला होता. त्या अनुशंगाने तपास करीत असताना सचिन दत्तात्रय जाधव (45) आणि मन्नु मारूती जाधव (45, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले.
दरम्यान, गुलटेकडी डायसप्लॉट येथील गोडाऊनची कडी उचकटून देवेंद्र कुमार ठक्कर (56, रा. धनकवडी) यांच्या मुद्देमालाची चोरी झाली होती. पोलिस कर्मचारी गुरव, वाघमोडे आणि पवार यांना गुन्ह्याती संशयीत आरोपीची माहिती मिळाली. त्यानंतर संतोष किरण लोखंडे (रा. गुलटेकउी) ताब्यात घेऊन चौकशी केली असता 27 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे निरीक्षक निरीक्षक सोमनाथ जाधव, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक येवले सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, ढावरे यांच्या पथकाने कारवाई करीत वरील गुन्हे उघडकीस आणले.





