Pune Crime : पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र सुरूच; जागेच्या वादातून तरुणाचा खून
Updated On:

पुणे : जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत संतोषनगर परिसरात शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. शुभम सुभाष चव्हाण असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास शुभम संतोषनगर परिसरातून घरी जात असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार अमर साकोरे आणि इतर दोघां साथीदारांनी थांबून जागेच्या संदर्भात विचारणा केली, त्यावेळी बाचाबाची झाली.
शुभम पळून जात असताना सराईत आरोपी अमर साकोरे आणि दोघांनी त्याचा पाठलाग करत लाकडी बांबू, काठी आणि दगड विटांनी मारहाण करत पसार झाले. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीसांकडून आरोपी मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.





