Pune Crime News : पुण्यात पोलीसांवर हल्ला करून पसार झालेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद
Pune Crime News : बाणेर पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेला सराईत गुन्हेगार बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी (वय ३०) याला गुन्हे शाखेच्या युनिट-५ आणि खंडणी विरोधी पथक-२च्या संयुक्त पथकाने थरारक पाठलाग करून अखेर जेरबंद केले.

Pune Crime News : बाणेर पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला करून फरार झालेला सराईत गुन्हेगार बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी (वय ३०) याला गुन्हे शाखेच्या युनिट-५ आणि खंडणी विरोधी पथक-२च्या संयुक्त पथकाने थरारक पाठलाग करून अखेर जेरबंद केले. (Pune Crime News)
त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी (वय ३५) आणि निहालसिंग रामजसिंग कल्याणी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनूसार २१ जून रोजी बाणेर पोलिसांचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींचा पाठलाग करत रामटेकडी, हडपसर येथे पोहोचले होते. त्यावेळी बिंतुसिंग कल्याणी आणि करणसिंग रजपुतसिंग दुधाणी हे दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. (Pune Crime News)
बिंतुसिंगने पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला, तर करणसिंगने धारदार शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर जखमी झाले. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ त्यांनी केलेल्या गोळीबारात करणसिंग दुधाणी जखमी झाला. (Pune Crime News)
मात्र, बिंतुसिंग तेथून फरार झाला होता. या घटनेनंतर गुन्हे शाखेचे युनिट-५ आणि खंडणी विरोधी पथक-२ यांनी त्याचा समांतर शोध सुरू केला. दरम्यान, पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले आणि शशिकांत नाळे यांना गुप्त माहिती मिळाली की, बिंतुसिंग हा बोरीऐंदी (ता. हवेली) गावाच्या शिवारात लपून बसला असून पुणे जिल्ह्याबाहेर पसार होण्याच्या तयारीत आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दरेकरवाडी रोड, बोरीऐंदी येथे सापळा रचला. तेथे बिंतुसिंग एका व्यक्तीसह उभा असल्याचे दिसताच पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालत पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्यासोबत असलेल्या हसपालसिंग कल्याणी यालाही ताब्यात घेण्यात आले. (Pune Crime News)
चौकशीत, हसपालसिंग कल्याणी आणि निहालसिंग रामजसिंग कल्याणी यांनी गुन्ह्याची माहिती असूनही बिंतुसिंगला लपवून ठेवत पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत. (Pune Crime News)
२५ गुन्ह्यांतील सराईत आरोपी
पोलीस अभिलेखानुसार बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे मिळून सुमारे २५ गुन्हे दाखल आहेत. तर हसपालसिंग कल्याणी याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे. (Pune Crime News)
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (Pune Crime News)
कारवाईत पोलीस निरीक्षक राम राजमाने, संदीपान पवार, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, तसेच पोलीस अंमलदार शहाजी काळे, शशिकांत नाळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, सुधीर सोनवणे, नासेर देशमुख, परमेश्वर कदम, नेत्रिका अडसुळ, तसेच खंडणी विरोधी पथक-२चे नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर आणि पवन भोसले यांनी सहभाग घेतला. (Pune Crime News)





