Pune Crime | पोलीस ठाण्यातच पेटून घेण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – ठाणे अंमलदार कक्षात आलेल्या तरुणाने आरडा ओरडा करून, गोंधळ घालून हातातील बॉटलमध्ये आणलेले डीझेल स्वतःच्या अंगावर ओतून माचीस काढून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोणीकंद पोलीस स्टेशन येथे मंगळवारी (दि.19) सायंकाळी उशिरा पावणे आठच्या सुमारास घडली.
त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिल्याचे आढळल्याने याप्रकरणी 25 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठाणे अंमलदार मच्छिंद्र वाळके यांनी फिर्याद दिली असून सौरभ पोटभरे (रा. पेरणे फाटा) या तरुणावर स्वतःचे व इतरांचे जीवित धोक्यात आणणारे कृत्य केल्याने बीएनएस कलम 287, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.





