पुणे : शहरात करोनाचे 159 नवे बाधित
Updated On:

पुणे – गेल्या 24 तासांत 159 बाधितांची नोंद झाली असून, 130 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांतील दोघे पुण्याबाहेरील आहेत.
एकूण बाधितांमधील सक्रीय बाधितांची संख्याही कमी झाली असून, सध्या ती 1 हजार 596 आहे. त्यातील 180 जणांची प्रकृती गंभीर असून, अन्य 268 जण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात 6 हजार 187 संशयितांची स्वॅबटेस्ट केल्या आहेत. आजपर्यंत 4 लाख 99 हजार 618 बाधितांची नोंद झाली असून, त्यातील 4 लाख 89 हजार 014 बाधित बरे झाले आहेत. दरम्यान, शहरात करोनाने आतापर्यंत 9 हजार 8 जणांचा मृत्यू झाला आहे.





