पुणे : वीजमीटरच्या नावे ग्राहकांची फसवणूक ; चार जणांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा

पुणे : “तुमचे वीजमीटर हळू चालत आहे. कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. तुमचे वीजमीटर बदलून देतो व त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल,’ असे सांगत महावितरण कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा चाकणमध्ये पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हे भामटे महावितरणचे जुने मीटर काढून गहाळ करणे व त्याठिकाणी बाजारातील मीटर ग्राहकांकडे लावत होते. महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संशयास्पद वीजमीटरची तपासणी सुरु केली. यामध्ये चाकण येथील नाणेकरवाडी, आंबेठाण रस्ता, माणिक चौक परिसरात काही ग्राहकांकडे वीजमीटर बदलले आहे,
परंतु त्याची महावितरणकडे त्यांची नोंद नाही किंवा जुने मीटर महावितरणकडे जमा केले नसल्याचे आढळून आले. याबाबत संबंधित वीजग्राहकांना विश्वासात घेत अधिक तपास केला असता, परस्पर वीजमीटर बदलून देण्यात आले. यात महावितरणचे सुमारे 1 लाख 22 हजार 277 युनिट्स विजेचे नुकसान केले.





