Pune: व्होडाफोन-आयडिया कंपनीविरोधात ग्राहक आयोगाचा निकाल

पुणे – ग्राहकाला नित्कृष्ट सेवा देणे व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीला महागात पडले आहे. दि. १ जानेवारी २०१८ ते ३१ ॉगस्ट २०२२ या कालावधीत स्वीकारलेली “फोर’जी ची रक्कम “टु’जी ने असलेल्या दरानुसार लागू करावी. उर्वरित रक्कम ग्राहकाला परत करण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर, सदस्या सरिता पाटील व शुभांगी दुनाखी यांनी दिला आहे.
याबरोबरच तक्रारदारांना नुकसान भरपाई म्हणून १० हजार रुपये व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी ३ हजार रुपये देण्यात यावेत. तसेच निकलाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाच्या आत अंमललबजावणी करावी. अन्यथा दरमहा ५०० रुपये देय होईल, असेही आदेशात म्हटले आहे.
याबाबत चंद्रशेखर जोशी (रा. बाणेर) यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार मोबाइल कंपनीचे ४ वर्षांपासून ग्राहक होते. कनेक्शन घेतल्यापासून नेटवर्क कव्हरेज योग्य नसल्याची तक्रार करत होते. मात्र, कंपनीने गांभीर्याने लक्ष दिले नाही. कंपनीने पाठविलेल्या ई-मेलवर हे मान्य देखील केले. तक्रारदारांच्या भागामध्ये २ जी नेटवर्क योग्य रितीने काम करते. मात्र, ३ जी आणि ४ जी अत्यंत कमी दर्जाचे आहे.
वारंवर मागणी करून नोडल आॅफिसरचा फोन नंबर व पत्ता दिला नाही. नंतर ट्रायच्या नियमानुसार कंपनीने नोडल आॅफिसरची नियुक्ती केली नसल्याचे तक्रादारांच्या लक्षात आले. तर तक्रारदारांना ३ वर्षांसाठी २९५ रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली. ३९९ रुपयांचा प्लॅन सहा महिन्यांकरिता २९९ रुपये केला.
मात्र, नुकसान भरपाई व कमी बिलाचा आदेश तक्रारदारांना मिळालाच नाही. त्यानंतर पुन्हा नुकसान भरपाईची रक्कम १,४१२ रुपयापर्यंत वाढविली. तक्रारदारांचा प्लॅन कल्पना न देता २९९ वरून पुन्हा ३९९ रुपये केला. दरम्यान तक्रारदरांची तक्रार बंद केल्याचे त्यांना ई-मेलने कळविले. त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक मंचात धाव घेतली. संधी देऊनही कंपनीकडून योग्य मुदतीत म्हणणे दाखल करण्यात आले नाही.





