पुणे:आचारसंहितेआधी कोट्यवधींची वर्गीकरणे

400 कोटी रुपयांच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे
खराडीत पीपीपी तत्वावरील रस्ते, पूल आणि नदीकाठ सुधार योजना
पुणे – खराडी आणि मुंढवा येथील पीपीपी तत्त्वावरील आठ रस्ते तसेच मुळा- मुठा नदीवरील उड्डाणपुलाच्या विकासासाठीच्या सुमारे 140 कोटी रुपयांच्या निविदा तसेच मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेची सुमारे 260 कोटी रुपयांची निविदा येत्या बुधवारी मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे येणार आहे. यापैकी रस्ते आणि उड्डाणपूल हे पीपीपी तत्वावर क्रेडिट नोटच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहेत. तर नदीकाठ सुधार योजनेच्या संगमवाडी ते बंडगार्डन पुलादरम्यानचा पहिला टप्पा महापालिकेच्या खर्चातून करण्यात येणार आहे.
रस्त्यांच्या कामांच्या अनुक्रमे दोन निविदांमध्ये प्रत्येकी चार कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीची एक टक्का कमी दराने आलेली 108 कोटी 16 लाख रुपयांची निविदा सर्वात कमी दराची आहे. तर यापैकी काही रस्त्यांची अन्य एक निविदेमध्ये व्हि. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीची पॉईंट 50 अधिक दराची 8 कोटी 44 लाख रुपये किंमतीची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे. त
र नदीवरील पुलाच्या कामासाठीही चार निविदा आल्या होत्या. त्यामधील निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीची 1.93 टक्के अधिक दराने आलेली 23 कोटी 47 लाख रुपये दराची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे. या पुलासाठी अन्य तीन कंपन्यांनी भरलेल्या निविदा 22 ते 35 टक्के अधिकच्या आहेत.
नदीकाठ सुधार योजनेची निविदा मान्यतेसाठी येणार
मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजनेतील संगमवाडी ते बंडगार्डन या पहिल्या टप्प्यासाठीच्या कामासाठी 305 कोटी रुपयांचे एस्टिमेट करून निविदा काढण्यात आली. या कामासाठी पाच कंपन्यांनी निविदा भरल्या असून, यासाठी पाच कंपन्यांपैकी बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीची 13. 14 टक्के कमी दराने आलेली अर्थात सुमारे 260 कोटी रुपयांची निविदा सर्वात कमी दराची ठरली आहे. जीएसटी, विमा, रॉयल्टीचा विचार करता या योजनेचा खर्च 320 कोटी रुपयांपर्यंत वाढणार आहे.





