बाजार बंद ठेवल्यास व्यापारी, आडत्यांचे परवाने रद्द करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) – मुख्यमंत्र्यासह जिल्हाधिकारी म्हणून संचारबंदीचे आदेश लागू करताना सर्व अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार असल्याचे खूप वेळा स्पष्ट केले आहे. त्यानंतर देखील व्यापारी, आडते बंद करण्याचा निर्णय घेत असतील तर परिस्थितीचा आढावा घेऊन व्यापारी, आडते यांचे परवाने रद्द करण्यात येतील.
तसेच वेळ प्रसंगी संबंधितावर पोलीसाकडून कारवाई देखील करण्यात येईल. याशिवाय भाजीपाल विक्रेत्यांनी नागरिकांकडून अधिकचे दर घेतले तर अशा विक्रेत्यांवर देखील कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.




