Pune Trafic : पुणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात; अहवालातून ‘ही’ माहिती आली समोर, जागतिक क्रमवारीत ‘या’ स्थानावर

पुणेः पुणे आणि वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गडद होत चालली आहे. ही वाढती वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी चांगलीच डोकेदुखी बनली आहे. एका संस्थेने केलेल्या अहवालात सर्वात जास्त वाहतूक कोंडीची समस्या असलेले पुणे शहराचा जागतिक क्रमवारीत चौथे स्थान तर देशात तिसऱ्या स्थानावर आहे. ही खरंतर चिंतेची बाब आहे. टॅामटॅाम या डॅनिश संस्थेच्या ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. या संस्थेने केलेल्या अहवालानुसार पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटं २२ सेकंदांचा काळ लागत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
तसेच जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी कोलंबियातील बरानकिला शहर पहिल्या स्थानावर आहे. तर भारतात तीन राज्यांचा पहिल्या पाचमध्ये नंबर लागतो. पश्चिम बंगालमधील कोलकत्ता हे शहर वाहतूक कोंडीत पहिल्या क्रमांवर आहे. त्यापाठोपाठ कनार्टक राज्यातील बंगळूरू हे दुसऱ्या स्थानावर आहे. तर महाराष्ट्राचा पुण्याचा क्रमांक चौथ्या क्रमांत लागतो. पुणे शहरात विविध भागात विकासकामे सुरू आहेत. काही ठिकाणची कामे धिम्यागतीने सुरू आहेत. यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गहन होत चाललेली आहे. या अहवालाने अधोरिखेत केलेली बाब राज्यकर्त्यांनी विचारात घ्यायला हवी आणि त्या दृष्टीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकून राहिल असे या अहवालाने स्पष्ट केले आहे.
ही आहेत जागतिक क्रमावारीत असलेली पहिली पाच शहरं
1.बरानकिला (कोलंबिया) : ३६ मिनिटे, ६ सेकंद
2.कोलकाता : ३४ मिनिटे,३३ सेकंद
3.बंगळुरु : ३४ मिनिटे, १० सेकंद
4.पुणे : ३३ मिनिटे,२२ सेकंद
5.लंडन : ३३ मिनिटे, १७ सेकंद





