Pune : काॅमन मॅन नव्हे सुपरमॅन..! जीवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्या दोन चिमुकल्यांची नागरिकाने ‘अशी’ केली सुटका; हडपसरमधील घटनेचा थरारक Video आला समोर..

Major fire broke out in Pune’s Hadapsar | हडपसर येथील एका जुन्या तीन मजली इमारतीला आग लागल्याची घटना आज घडली. यामध्ये स्थानिक रहिवाशांनी दोन लहान मुले आणि एका महिलेला वाचवले. तर नंतर आलेल्या अग्निशमन दलाने चार रहिवाशांची सुटका केली. याघटनेत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनूसार हडपसर येथील वैभव सिनेमा जवळील एका जुन्या तीन मजली इमातीतील तीसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेत साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. आग मोठ्या प्रमाणात भडकल्यावर रहिवाशांनी याची कल्पना आली.
View this post on Instagram
रस्त्यावरुण जाणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ दिसू लागल्यावर त्यांनी रहिवाशांना आवाज दिला. तसेच अग्निशमन दलालाही कॉल केला. दरम्यान आग लागलेल्या सदनिकेजवळील सदनिकेत एक महिला आणि दोन लहान मुले अडकली होती. त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्गच नव्हता.
Pune : काॅमन मॅन नव्हे सुपरमॅन..! जीवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्या दोन चिमुकल्यांची नागरिकाने ‘अशी’ केली सुटका, हडपसरमधील घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर…. #Fire #Punenews #पुणे #Pune #Hadapsar
बातमीची Link 👇👇👇👇https://t.co/GDt3OqaZ1I pic.twitter.com/7s1tpqZwKv
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 15, 2024
अशा वेळी, जीवाची पर्वा न करता व कोणाचीही वाट न पाहता स्थानिक नागरिकांनी गॅलरीतील ग्रीलवरुन चढत दुसरा मजला गाठला. तेथून मुलांना आणि महिलेला दुसऱ्या मजल्यावर उतरवले. या तीघांची सुटका करेपर्यंत अग्निशमन दलाचे तीन बंब, एक टँकर आणि एक रेस्क्यु व्हॅन दाखल झाले. त्यांनी त्यानंतर इमारतीत अडकलेल्या चौघा नागरिकांना बाहेर काढले. त्यानंतर वीस मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे , अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली.
Pune : काॅमन मॅन नव्हे सुपरमॅन..! जीवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्या दोन चिमुकल्यांची नागरिकाने ‘अशी’ केली सुटका, हडपसरमधील घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर…. #Fire #Punenews #पुणे #Pune #Hadapsar
बातमीची Link 👇👇👇👇https://t.co/GDt3OqaZ1I pic.twitter.com/7s1tpqZwKv
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 15, 2024
या इमारतीतील नागरिकांनी काही सदनिकांत व्यावसायीक वापर केला आहे. आग लागलेल्या सदनिकेत फोटो फ्रेम बनविण्याचे साहित्य, पुठ्ठे मोठ्या प्रमाणात होते. यामुळे आग चांगलीच भडकली. तसेच खालच्या मजल्यावरही फ्रेमचे साहित्य होते. तिन्ही मजल्यावरील काही सदनिकांचा व्यावसायीक वापर करण्यात येत होता,अशी माहिती समोर येत आहे.





