Pune : 20 रोपांच्या वृक्षारोपणाने चेतन गायकवाड शाळेचा 20 वा स्थापना दिन साजरा
Pune : खडकी येथील चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम शाळेचा २० वा स्थापना दिन यंदा पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

Pune : खडकी येथील चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम शाळेचा २० वा स्थापना दिन यंदा पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते २० रोपांचे वृक्षारोपण करून वर्धापनदिनाला अनोखी सामाजिक दिशा देण्यात आली.
कार्यक्रमास खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम, संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संचालक अजय सूर्यवंशी, मधुकर टिळेकर, काशीनाथ देवधर, धीरज गुप्ता, डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सहशिक्षिका ऋतुजा मोरे व रजनी सकपाळ यांनी कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
विद्यार्थ्यांनी सुसंगत व चांगल्या मैत्रीचा वारसा जपावा. योग्य संस्कार आणि सकारात्मक वातावरणातूनच शाळेचा इतिहास उज्ज्वल घडतो, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
पर्यवेक्षक गिरीश ननावरे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या सरिता नायर यांनी शाळेच्या गेल्या २० वर्षांतील शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. वृक्षारोपण उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्काउट-गाइडच्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक सहशिक्षिका सुष्मिता चक्रवर्ती यांनी विशेष परिश्रम घेतले. सहशिक्षिका सविता भालेराव व रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर मृणालिनी दारकोंडे यांनी आभार प्रदर्शन केले.
“वर्धापनदिनाला पर्यावरणाची जोड”
“विद्यार्थ्यांना वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल घडते. कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही उपक्रमशील शिक्षकांच्या बळावर आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहोत. त्यामुळे शाळेचा वर्धापनदिन वृक्षारोपणाने साजरा करण्याची नवी संकल्पना यंदा राबविली आहे,” असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.






