Pune : वारजे माळवाडी परिसरात भीमराव तापकीर यांचा प्रचार दौरा

धनकवडी – खडकवासला मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांचा प्रचार दौरा वारजे माळवाडी या भागामध्ये होता. वारजे माळवाडी येथे तापकीर यांना मोठा प्रतिसाद मिळाला. तापकीर यांनी प्रचारात नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटीगाठीद्वारे प्रचार केला.
वारजे येथील उद्यान वॉकिंग ट्रॅकला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक किरण बारटक्के, भाजपा मा.अध्यक्ष पुणे शहर सहकार आघाडी सचिन दांगट, माधव देशपांडे, पराग ढेणे आदी उपस्थित होते. लोकांसाठी निःस्वार्थ नेतृत्व असलेले खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मनामध्ये प्रामाणिकता, मितभाषी स्वभाव आणि कामांमधून परिणाम साधणारे नेतृत्व म्हणून भिमराव तापकीर यांची ओळख आहे.
गोंधळ न करता, गाजावाजा न करता, काम करत राहणे हा त्यांचा स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. ते कधीही मतदारांना खोटी आश्वासने किंवा प्रलोभने देत नाहीत. त्यांच्या मते, कामाची प्रामाणिकता आणि लोकांचा विश्वास हाच विजयाचा खरा मार्ग आहे. लोकांसाठी सतत उपलब्ध, कोणतीही अडचण असो, अण्णा नेहमी मतदारांच्या सोबत उभे असतात. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याशी संवाद साधणे सोपे वाटते. कामगिरीचा पाया, विश्वासाचा आधार असल्याने गेल्या अनेक वर्षांतील त्यांच्या कार्याने खडकवासल्यात विकासाचे नवे अध्याय लिहिले आहेत.
रस्ते, पाणीपुरवठा, समाविष्ट गावांमधील विकासकामे, वीजपुरवठा, पर्यटन विकास, ब्रिज, समाजमंदिर, ओपन जिम, सोसायट्याना वीज बिल बचतीसाठी सोलर प्रकल्प आणि इतर मूलभूत विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.





