Pune: बिबवेवाडीमध्ये अल्पवयीनांकडून तरुणावर क्रूर हल्ला; तीन आरोपी ताब्यात
Updated On:

पुणे – बिबवेवाडी परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. अप्पर डेपो जवळ अंदाजे १८ वर्षाच्या तरुणावर तीन अल्पवयीनांनी मिळून अत्यंत क्रूरपणे वार केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टॅग्स:





