Pune : फुरसुंगीत भाजपचा पक्षप्रवेश सोहळा

फुरसुंगी – भेकराईनगर-फुरसुंगी परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच तसेच महिला भगिनींनी फुरसुंगी-उरुळी देवाची मंडल सरचिटणीस संतोष हरपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
फरसुंगी येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. या परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न संतोष हरपळे यांच्या माध्यमातून सुरू आहे. या पक्षप्रवेशामुळे या भागात भाजपची ताकत वाढली आहे. भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे व पक्षामार्फत सुरू असलेली कामे, कशा स्वरूपात चालतात याची माहिती जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी दिली.
यावेळी महिला आघाडी सरचिटणीस पदी अर्चना तेलकर, महिला आघाडी उपाध्यक्ष रेखा काळे, महिला आघाडी चिटणीस मंगल शिरसाट, महिला आघाडी विभाग प्रमुख राणी नाळे, उपाध्यक्ष गणेश धोंडगे, युवा मोर्चा चिटणीस रोहित केकान अशा निवडी करण्यात आल्या.
या कार्यक्रमास मध्य हवेली ता. मा.अध्यक्ष संदीप हरपळे, धनंजय कामठे, राहुल हरपळे, हर्षवर्धन हरपळे, वैशाली पवार, सागर खुटवड, पांडुरंग रोडे, आकाश हरपळे, सौरभ हरपळे, वैभव भाडळे, गणेश जगताप, सूरज बिरे, अमोल पाटील, संतोष चाकोरे व स्वयंभू फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच संकेत विहार, पावर हाऊस, भेकराईनगर परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी आभार मानले.





