पुणे : भरूपूर खा.., पालेभाज्या ; आवक वाढल्याने भावात घट
Updated On:

पुणे : शेतमाल काहीसा महाग झाला की, विशेषत: पालेभाज्या महाग झाल्याची कुरबुर सुरू होते. मात्र, या आठवड्यात हिरव्या पालेभाज्यांच्या भावात घट झाली आहे.
मेथी, शेपू, चाकवत, पुदीना, मुळे, चवळई, हरभरा गड्डीच्या भावात घट झालेली आहे. मागणी आणि पुरवठा यात समतोल असल्याने पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चाकवत आणि मुळा भाजीच्या भागवात एक जुडीमागे प्रत्येकी तीन रुपयांनी घट झाली आहे. हरभरागड्डी दोन रुपये तर मेथी, शेपू, पुदीना आणि चवळईच्या भावात गड्डीमागे प्रत्येकी एक रुपयांनी घट झाली.
रविवारी (दि़. २८) कोथिंबिरीची तब्बल पावणेदोन लाख जुडी, तर मेथीची एक लाख जुडी तर हरभरागड्डीची ४ ते ५ हजार जुडी इतकी आवक झाल्याने भाव स्थिर आहेत. यामुळे पुणेकरांच्या खिशाला आठवडार तर ताण येणार नसल्याची सध्याची बाजारातील स्थिती आहे.





