Pune | लाच प्रकरणात महावितरणच्या उप कार्यकारी अभियंत्याला जामीन

पुणे – ग्राहकांचे ओपन प्लॉटमधील ट्रान्सफामर कनेक्शन देण्यासाठी अंदाजपत्रक पास करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यासाठी इलेक्ट्रीक ठेकेदाराकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या महावितरणच्या उरळी कांचन शाखेतील उप कार्यकारी अभियंत्याला न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.
प्रदीप वासुदेव सुरवसे (वय 48, रा. हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. सुधीर शहा आणि ऍड. सुहास कोल्हे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला.
ही घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. त्याने न्यायालीन कोठडीत असतना जामिनासाठी अर्ज केला होता.
तो कामाला असलेल्या उरळी कांचन येथील महावितरणच्या कार्यालयात दोन महिने न जाणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे आणि दोन महिने पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी एसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी हा आदेश दिला.





