PUNE: घरफोडी प्रकरणात जामीन फेटाळला
Updated On:

पुणे – घरफोडी करून 28 लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याचा आरोप असलेल्याचा जामीन सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी फेटाळला. सागरसिंग सुरजसिंग ऊर्फ कट्यासिंग बावरी ऊर्फ अंधरेले (वय 24, रा. जालना) असे त्याचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील साथीदार अद्याप फरार आहे.
गुन्ह्यातील आणखी मालमत्ता जप्त करायची आहे. त्यासाठी त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिल आहे. 8 एप्रिल रोजी सासवड येथे ही घटना घडली आहे. याबाबत ज्ञानेश्वर सुभागडे (वय 62) यांनी फिर्याद दिली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अंधरेले याने जामिनासाठी अर्ज केला होता.





