पुणे: एमआयटी’च्या विद्यार्थ्यांची स्वयंचलित ई-रथ वाहननिर्मिती

30 किमी प्रतितास वेगमर्यादा : संगणक आणि रेडिओ नियंत्रण शक्य
पुणे – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंचलित ई-रथ वाहनाची निर्मिती केली आहे. रिमोट ड्रायव्हेबिलिटी आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग क्षमता असलेली चार चाकी ई-रथ इलेक्ट्रिक वाहन यशस्वीरित्या डिझाइन केले आहे.
या वाहनाची निर्मिती विद्यार्थी मिरज इनामदार, प्रज्वल वेर्णेकर, साईबाबा नरगुंद, प्रथमेश वाणी, अद्वैत उटगीकर, सौमित्र महाजन व पूर्वा अपराज यांनी केली आहे. त्यांना डॉ. अल्का एस. बारहत्ते आणि प्रा. पी. एस. महाजनी यांनी मार्गदर्शन केले. ई-रथ मॅन्यूअल ड्राइव्ह तसेच संगणक आणि रेडिओ नियंत्रणाद्वारे रिमोट ड्राइव्ह करण्यास सक्षम आहे. यात ओपन डिफरेंशियल एक्सल असलेली इलक्ट्रिक मोटर असून जी ड्रम ब्रेकसह येते. याची ऑनबोर्ड लोड क्षमता 200 किलोग्रॅम आहे. 30 किमी प्रतितास वेगमर्यादा असून यात ड्युअल ऍप्लिकेशन मेकॅनिझममुळे उत्कृष्ट ब्रेक असेब्ली आहे. त्यामुळे मॅन्युुअल आणि रिमोट दोन्ही मोडमध्ये बोल्ट ऑफ प्रक्रियेसह हे वाहन वापरले जाऊ शकते.
ओसीएम इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टिअरिंग सिस्टिम याची विशेषत: आहे. दिशा नियंत्रित करण्यासाठी रिमोट मोडमध्ये अखंडपणे वापरली जाऊ शकते. थ्रॉटल यंत्रणा दुहेरी चॅनल प्रणालीमध्येही सुधारणा केली गेली आहे. यात भौतिक पेडल्स व ऑनबोर्ड संगणकावरून इनपुट प्राप्त होते.
संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड आणि कार्याध्यक्ष राहुल कराड, इंजिनिअरिंग विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. भरत चौधरी, डॉ. अनिल हिवाळे, डॉ. विनया गोहोकर, डॉ. अनुराधा फडके, डॉ. सुनील सोमाणी व डॉ. जी.एन.मुळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.





