Pune : अश्विनी कदम यांच्या आपुलकीच्या गाठीभेटी

बिबवेवाडी – जनता वसहतीमधील अनेक तरुण कामासाठी, व्यावसायानिमित्त बाहेर जातात, त्यांच्या घरी परतण्याच्या वेळा मध्यरात्रीच्या असतात, त्यांना पोलिसांकडून अनेकदा हटकले जाते. त्यामुळे त्यांना ओळखपत्र देण्याचा आग्रह धरणार. भारतीय भाषांना वैभव प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानपीठ विजेत्यांची सर्वांगीण माहिती असणारे संग्रहालय पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये उभारणार असल्याचे महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांनी सांगितले.
महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र. 30 जनता वसाहत मधील गल्ली नंबर 1 ते 108 याठिकाणी नागरीकांशी संवाद आणि आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी संजय बालगुडे, स्वाती पोकळे, बबलू जाधव, चंदन साळुंखे, हेमंत राजभोज, निलेश बोराटे, राकेश नामेकर, इंद्रजीत शिंदे, रितेश परमार, पिरमोद शेलार, बंटी शेलार, बाबा मासोळे, सोहम मासोळे, केतन नागडे, दिलीप राऊत आदी महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पुणे शहरात महिला स्वच्छतागृहाचा विषय तसेच महिलांसाठी स्वतंत्र जिमची संकल्पना पूर्णत्वास नेणाऱ्या आदर्श नगरसेविका म्हणून अश्विनी नितीन कदम यांचे कार्य आम्ही पाहिले आहे. त्या आमदार म्हणून पर्वती विधानसभेचा विकासात्मक कायापालट करतील.” – सीमा महाडिक, सचिव, काँग्रस कमिटी सोशल मीडिया महाराष्ट्र
मातंग एकता आंदोलनाचा पाठिंबा
मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटना आणि मातंग समाजातील विविध संघटनेच्या वतीने महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांना अविनाश बागवे यांच्या नेतृत्वात जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी मातंग एकता आंदोलन राज्य समन्वयक विठ्ठल थोरात, महिला आघाडी उपाध्यक्ष रुक्मिणी धेडे, रावसाहेब खवळे, राजू गायकवाड, सचिन जोगदंड आदी उपस्थित होते.




