pune : कलाकारांनीही काढली दिंडी

पुणे : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवार ट्रस्टतर्फे संयुक्त कलाकार दिंडी शुक्रवारी भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य आणि विविध कला क्षेत्रातील कलाकारांनी दिंडीत सहभाग घेतला.
संतांच्या चरणी… कलेच्या संगतीने! या संकल्पनेवरील दिंडीत कलाकारांनी वारकऱ्यांसोबत पायी चालत भक्ती आणि कलेचा सुंदर संगम अनुभवला.दिंडीतून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त वारी, जलसंधारण, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक बांधिलकीची जनजागृती करण्यात आली.
महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, ॲड. मंदार जोशी, रजनी भट, जयमाला इनामदार, सुनील गोडबोले, तृप्ती देसाई, डॉ. उत्कर्ष शिंदे, राज काझी, वासू पाटील, अजित शिरोळे,
अनिल नगरकर, राधा कुलकर्णी, आर्या घाटे आदी कलाकार, पदाधिकारी दिंडीत सहभागी झाले. बालगंधर्व रंगमंदिर येथून महापालिका भवन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, दिंडी पालखी चौक, नाना पेठ येथे दिंडी दर्शनासाठी पोहचली.





