Pune : पोलीस डोळे झाकून बसलेत का?

Pune : सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करण्यांना सोडू नका. त्यांना वाचविणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी. असा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना दिल्या.
सोशल मीडियावर अनेकांचे दहशतीचे रील्स, फोटो व्हायरल होत असताना पोलीस डोळे झाकून बसलेत का? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.
कोथरूड परिसरात तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केली आहे. तो तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडिया हॅन्डल करतो, असे बोलले जाते.
त्यावर बोलताना मोहोळ म्हणाले, हा तरुण माझ्या कार्यालयात काम करत नसून, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र, कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर पुण्यातील प्रत्येक तरुण किंवा नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांची कडक भूमिका पाहिजे. माझ्या शहराचे खराब होत असेल, तर ते चालू देणार नाही.
हा एका कार्यकर्त्याचा विषय नसून पुणेकरांच्या सुरक्षिततेचा विषय आहे. पुणे पोलिसांवरही हात उचलला जात असेल, तर माझ्या पोलिसांना कडक सूचना सूचना आहेत, जो चुकतोय त्यावर तात्काळ कडक कारवाई झालीच पाहिजे.
– मुरलीधर मोहोळ – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री





