Pune : तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर सदस्यांची नियुक्ती

पुणे : राज्यातील तृतीयपंथीय कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
राज्यातील तृतीयपंथीय यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये मंडळाची संरचना तसेच कार्य व उद्दिष्टे ठरविण्यात आलेली आहेत.
मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या १३ अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द करून त्यामध्ये नवीन अशासकीय सदस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. राज्याचे तृतीयपंथीयांसाठीचे धोरण २०२४ जाहीर करण्यात आले आहे.
धोरणात नमूद केल्यानुसार राज्यस्तरीय संरचनेमध्ये बदल करुन सुधारित संरचनेनुसार राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळावर नव्याने अशासकीय सदस्यांचा समावेश करुन समितीचे पुनर्गठन करणे आवश्यक असल्याने तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची पुनर्रचना करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिलेली आहे.





