Pune : ओळखपत्रासाठी नोंदणीचे आवाहन
Updated On:

पुणे : सैनिक कल्याण विभागामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व वीरपिता यांना ऑनलाइन पद्धतीने आर्थिक मदतीचा लाभ मिळण्यासाठी ३१ मे २०२५ पर्यंत नवीन ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन आले आहे.
सैनिक कल्याण विभागाच्या https://mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. त्यानंतर कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, बी. विंग, विधानसमोर पुणे-१ येथे अर्जाची मूळ प्रत जमा करून नवीन ओळखपत्रही घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण विभागाने केले आहे.




