Pune : साधू वासवानी यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक रथयात्रा

Updated On:
Pune : साधू वासवानी यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक रथयात्रा

पुणे – संत साधू वासवानी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील साधू वासवानी मिशनतर्फे दि. २३ नोव्हेंबर रोजी वार्षिक रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाचे यंदा ५८ वे वर्ष होते.

प्रामुख्याने अहिंसा आणि प्राण्यांच्या हक्कांसाठी नागरिकांना या रथयात्रेच्या माध्यमातून आवाहन केले जाते. मिशनपासून सायंकाळी ५ वाजता ही मिरवणूक सुरू झाली आणि पुणे कॅम्प परिसरातल रस्त्यांवरून निघून रात्री ८ वाजता तिची सांगता झाली. साधू वासवानी यांची भव्य प्रतिमा आणि दादा जे. पी. वासवानी यांचा पुतळा असलेला रथ, अंतराळ यानासारखे वाहन हे यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.

मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णा कुमारी यांनी या रथयात्रेचे नेतृत्व केले आणि सहभागी साधक आणि नागरिकांना प्रसादाचे वाटप केले. प्राण्यांबद्दल दयाभाव आणि करूणा व्यक्त करणारे विविध संदेश दर्शवत या वेळी जनजगृती करण्यात आली. रथयात्रेत भजन आणि कीर्तन गाणाऱ्यांसह साधक चालत आणि जप करत होते.

यावेळी बोलताना दीदी कृष्णा कुमारी म्हणाल्या, की “संत साधू वासवानी यांनी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. आपण सर्वांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी शाकाहारी दिवस अर्थात “मीटलेस डे’ पाळावा. नैसर्गिक आरोग्य जपण्यासाठी आणि सृदृढतेसाठी शाकाहार हा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी संबंधित बातम्या

Sports competition : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्रीदत्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

2026-10-09 16:37:30

Sports competition : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्रीदत्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

Pune : कार, बुलेटसह १४ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; चंदुकाका सराफ आता चाकण आणि तळेगांव दाभाडेकरांच्या सेवेत

2026-10-09 11:28:00

Pune : कार, बुलेटसह १४ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; चंदुकाका सराफ आता चाकण आणि तळेगांव दाभाडेकरांच्या सेवेत

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

2026-10-09 07:53:50

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

MPSC Protest: पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

2026-10-09 07:39:26

MPSC Protest:  पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

2026-10-09 07:32:38

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा