पुणे : अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गुरुजी तालीम गणपतीची केली पूजा; गुलाल उधळला
Updated On:

पुणे : श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. आज आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वजण निरोप देत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पुण्यातल्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्यातच मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीची अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पूजा केली. तसेच गुलाल देखील उधळला.
दरम्यान, या ठिकाणी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे एकत्र असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एकाच वादा अजित दादा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.




