पुण्यातील प्रशासन अलर्ट मोडवर! दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातील सुरक्षा यंत्रणा वाढवली, स्पेशल कमांडो तैनात

Pune News : भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकला अॅापरेशन सिंदूर अंतर्गत चोख प्रत्युत्तर देत हवाई हल्ले केले आहेत. यामुळे पाकिस्तानची अशरक्ष: दाणादाण उडाली आहे. भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर खरदारीचा उपाय म्हणून भारतात सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी देखील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे. पुण्यात देखील प्रशासन अलर्ट मोडवर असून पुणे विमानतळावरील अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहे. तसेच शहरातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दगडूशेठ मंदिर परिसरात स्पेशल पोलीस विभागाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. तसेच दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले आहे. भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासोबच वैद्यकीय सेवा देखील अलर्ट मोडवर आहेत. सर्व डॅाक्टर व वैद्यकीय संस्थांना स्थानिक यंत्रणासोबत समन्वय ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. औषधे, खाटा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
View this post on Instagram
भारताची पाकिस्तावर कारवाई करण्याचे सत्र सुरूच असून पाकिस्तानने केलेले ५० ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले आहेत. या कारवाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारताकडून १०० हून अधिक क्षेपणास्त्र पाकिस्तानवर डागण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घराजवळच ड्रोन हल्ला केला आहे.





