Pune : आरोपी दत्तात्रय गाडे शेतात, तरी मोबाईल नाही पोलिसांच्या हातात

पुणे : स्वारगेट एसटी स्थानकातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला गुन्हे शाखेने शुक्रवारी तपासाठी गुनाट गावी नेले होते. तेथे त्याने मोबाईल कोठे फेकून दिला ही माहिती घेतली. त्याने सांगितलेल्या ठिकाणी तपास केला असता मोबाईल सापडला नाही. दरम्यान, यावेळी गावातील काही नागरिकांचे जाब जबाबही घेण्यात आले.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास सोमवारी स्वारगेट पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. यानंतर तपासाला वेगाने सुरवात झाली. गाडेचे मागील गुन्हयांचे सर्व रेकॉर्ड तपासण्यात आले. क्राईम सिनही रिक्रीएट करण्यात आला. गाडे गुन्हा केल्यानंतर तो सर्व प्रथम कोठे गेला, कसा गेला, तो कोठे कोठे लपून बसला होता. त्याला लपण्यास कोणी मदत केली का? याचा तपास गुन्हे शाखा करत आहे. या तपासाचाच एक भाग म्हणून त्याला दुपारी १२ वाजता गुनाट गावात नेण्यात आले. तेथे त्याच्या घराची पहाणी करण्यात आली.
पूर्वी येथून त्याने अत्याचाराच्या वेळी वापरलेले कपडे जप्त करण्यात आले होते. तो दोन दिवस ज्या शेतात लपला होता, त्या शेतात त्याला नेण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी करुनही त्याचा मोबाईल हाती लागला नाही.
ऊसाचे शेत सात ते आठ एकरात पसरले असल्याने ऊसतोडणी झाल्यावरच मोबाईल हाती लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.





