Pune Accident: नऱ्हे सेल्फी पॉईंटजवळ विचित्र अपघात; दोन महिला ठार, पाच जण जखमी

पुणे – कात्रज – देहू रोड बायपासवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. हा अपघात भुमकर चौक आणि नवले पूल दरम्यान बायपासच्या नर्हे सेल्फी पॉईंटजवळ झाला.
सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कात्रज बोगद्यातून एक वेगाने जाणारा कंटेनर ट्रक वारजेच्या दिशेने जात असताना भूमकर पुलाच्या उतारावर एका पिक-अप ट्रकवर आदळला. पिक-अप ट्रकने भरधाव वेगाने तीन दुचाकींना धडकला. दोन्ही महिला दोन वेगवेगळ्या मोटरसायकलींवर सहकाऱ्यांना घेऊन चालल्या होत्या. दोन महिला आणि इतर पाच जखमी व्यक्ती रस्त्याच्या पडल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली.
सिंहगड रोड पोलिसांचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले की, “आम्ही दोन मृत महिलांची ओळख फातिमा इरफान पटेल(36 पिंपरीजवळील काळेवाडी) आणि सोलापूरमधील मंगळवेढा येथील अंजुमन मुन्ना मुजावर (19)” अशी मृतांची नावे आहे.अपघातात अजील बबीब पटेल, सुमैय्या हर्जत पटेल, अरबाज हबीब पटेल, शोएब हर्जत पटेल आणि वैभव कैलास काळे हे जखमी झाले. त्यांना नवले पुलाजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाघमारे म्हणाले. आम्हाला अद्याप कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवायचे आहे.
स्थानिक रहिवाशांनी जखमींना जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले जेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले. कंटेनर ट्रकचा चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, वाहतूक पोलिसांनी त्याच्या मागे धाव घेत त्याला वडगाव पुलाजवळ पकडले. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने जवळपास दीड तास विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. अपघातग्रस्त वाहने नर्हे परिसरात हलवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास वाहतूक पूर्ववत केली.




