Pune Accident: डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपीएल चालकाचा मृत्यू
Updated On:

पुणे – महापालिकेच्या घंटागाडीच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपीएल बस चालकाला दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) सकाळी वानवडी भागात घडली. पीएमपीएल बस आणि घंटागाडीचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर पीएमपीएल चालकाने खाली उतरून घंटागाडीचा फोटो काढला. फोटो काढून पाठीमागे जात असतानाच डंपरचालकाने वाहन सुरू केल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजत किशोर बाभुळकर (२८) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर, संजय मच्छिंद्र देशमुख असे अपघातात मृत्यू झालेल्या पीएमपीएल चालकाचे नाव आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास वानवडीतील संविधान चौक भागात ही घटना घडली.




