Pune Accident : भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर वाहनचालक पसार
Updated On:

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेशसिंग तोमर (वय ३३, रा. मध्यप्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक शांताराम कोळुरे यांनी यासंदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तोमर दोन दिवसांपूर्वी रात्री लोहगावमधील कलवड वस्ती परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने तोमरला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एस. पाठक तपास करत आहेत.




