पुणे : मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडले ; दोन चिमुरड्यांसह तिघांचा जागीच मृत्यू

Pune Accident । पुण्यातील वाघोलीत एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. याठिकाणी फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी तिघांचा जागीच जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असून जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्यातील वाघोली येथील केसनांद फाट्यावर रात्री 12 ते 1 च्या सुमारास हा अपघात झाला. डंपर चालक दारूच्या नशेत होता, अशी प्राथमिक माहिती आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फूटपाथवर झोपलेल्यांना चिरडले Pune Accident ।
अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीहून कामानिमित्त आले होते. या पदपथावर एकूण 12 जण झोपले होते. बाकीचे लोक फूटपाथच्या बाजूला झोपडीत झोपले होते. भरधाव डंपर थेट फूटपाथवर जाऊन झोपलेल्या लोकांना चिरडले.
मृत झालेल्यांची नावं –
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावं-
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
आरोपी डंपर चालकाला अटक Pune Accident ।
डंपर चालक क्रमांक MH 12 VF 0437 याने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे. आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड यास ताब्यात घेतला आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत.
हेही वाचा
Ajit Pawar: विधानसभेच्या निकालाच्या दिवशी आई काय करत होती? अजित पवारांनी सांगितला घरातील ‘तो’ किस्सा





