पुणे: वस्त्र कलेचे उत्तम प्रकार पाहण्याची अनोखी संधी, ‘झपूर्झा’तर्फे पहिला बिनाले सुरू

Updated On:

पुणे – टेक्सटाइल आर्ट अर्थात वस्त्र कला शेकडो वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच वारसा असणारी ही कला भारतात जागतिक स्वरूपात सादर करण्याच्या हेतूने देशात पहिल्यांदाच वर्ल्ड टेक्सटाइल आर्ट (डब्ल्यूटीए) बिनाले झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयातर्फे पुण्यात कुडजे येथे भरविला आहे.

डब्ल्यूटीए सुरू होऊन २५ वर्षे होत असून, त्यानिमित्त हा बिनाले होत आहे. जागतिक पातळीवरील हा १० वा बिनाले असून, भारतातील पहिलाच आहे. जागतिक पातळीवर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान विविध अमेरिका, ब्रिटन, युरोपातील निवडक देशांबरोबर पहिल्यांदाच भारताबरोबर ब्राझील, इटली, कोरिया व तुर्कीत डब्ल्यूटीए होत आहे.

खडकवासला धरणाजवळील एनडीए पीकॉक बेजवळील कुडजे येथील झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयात डब्ल्यूटीए भरविण्यामागचा उद्देश सांगताना झपूर्झाचे संस्थापक अजित गाडगीळ म्हणाले, की भारताच्या वस्त्र कला पुरातन असून, इतिहास सिल्क रोड काळापासूनचा आहे. त्यामुळेच आधुनिक जगाला भारताचा वस्त्र कलेचा ठेवा अनुभवता येण्यासाठी आणि जागतिक पातळीवर भारतीय कलाकारांची कला पोचण्याचा हा प्रयत्न आहे. झपूर्झा संग्रहात असणारी वस्त्र कला व अन्य कलाकारांची कला येथे पाहायला मिळेल.

कलाकार व क्यूरेटर राजू सुतार म्हणाले, की वस्त्र कलेचा बिनाले करताना आधुनिक, ऐतिहासिक, परंपरा, व तत्त्वज्ञान यांचा मेळ साधता आला आहे. या ठिकाणी केवळ कलाकार व त्यांची वस्त्र कला सादर होत नसून, यातून भावना समोर आल्या आहेत.

भारतीय डब्ल्यूटीए स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरित

भारतात होत असलेल्या डब्ल्यूटीएमध्ये देशातून १६ वस्त्र कलाकार सहभागी होत आहे. बिनालेमध्ये ५० आर्ट फॉर्म्स सादर होत आहेत. भारतात बिनाले होत असल्याने याच्या नावाची प्रेरणा स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीपासून मिळाली आहे. इंग्रजांविरुद्ध लढा देताना महात्मा गांधी यांनी स्वदेशीची हाक दिली आणि स्वतःच सूतकताई करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतातील डब्ल्यूटीए बिनालेचे नाव थ्रेड टू फ्रीडम, असे ठेवले आहे. जागतिक पातळीवर अमेरिकेत १९९७ मध्ये कोलंबियातील वस्त्र कलाकार पिलर तोबान यांनी महिलांसाठी डब्ल्यूटीची स्थापना केली. यासाठी प्रेरणा होती पारंपरिक वस्त्र कला व आधुनिक शैली. पुढे जाऊन डब्ल्यूटीएमध्ये पुरुष कलाकारांनाही स्थान मिळाले.

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी